ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात राशीनमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचा जल्लोष
राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, राशीन येथे आज विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा, लेझीम, टिपऱ्या तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत राशीन शहरातून भव्य मिरवणूक काढली.

मिरवणुकीत विद्यार्थिनींचा ढोल-ताशा पथकातील सहभाग विशेष आकर्षण ठरला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची आठवण करून देणारी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. ढोल-ताशांचा निनाद, लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि टिपऱ्यांच्या ठेक्यामुळे संपूर्ण राशीन शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मिरवणुकीपूर्वी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शाहू राजेभोसले, रामकिसन साळवे, माऊली सायकर व मुख्याध्यापक प्रकाश उधाणे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ॲड. सुरेश शिंदे, अशोक जंजिरे, डॉ. विजय चव्हाण, सुभाष जाधव, जितेंद्र शेटे, अंबादास गव्हाणे तसेच रयत सेवक कानगुडे सर, सय्यद सर, सोनवणे सर, झगडे सर उपस्थित होते.

कार्यक्रमास उपमुख्याध्यापक संग्राम राक्षे, पर्यवेक्षक शिवाजी बाबर, पर्यवेक्षक किशोर करपे, गुरुकुल प्रमुख भिसे सर, बिबीशन चव्हाण, विकी साळवे सर, शरद पवार सर यांच्यासह श्री जगदंबा विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती काळे, पोलीस हवालदार हिंगे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारातून शिक्षणाची ज्योत समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या या मिरवणुकीतून शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश राशीन शहरात प्रभावीपणे पोहोचला.

















