घोगरगाव–रुईखेल शिव रस्त्याची मोजणी यशस्वी; शेतरस्ते अभियानाला गती
श्रीगोंदा | प्रतिनिधी सागर शेळके
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते अभियानांतर्गत घोगरगाव–रुईखेल शिव रस्त्याची ९ सप्टेंबर रोजी मोजणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कायमस्वरूपी वहिवाट रस्ता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

श्रीगोंदा–पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे व भूमी उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या आदेशानुसार परिरक्षण भूकरमापक वासुदेव पाटील यांनी मोजणी केली. यावेळी शिवपानंद चळवळीचे मार्गदर्शक दादासाहेब जंगले पाटील उपस्थित होते.
मोजणीदरम्यान काही गटांचे काम उर्वरित राहिले असून, ते पुढील नियोजित तारखेला पूर्ण करण्यात येणार आहे.

यावेळी घोगरगावच्या सरपंच सौ. सुजाता भोसले, तलाठी सौ. अश्विनी श्राद्धे, रुईखेल तलाठी प्रतीक धनवटे, सागर शेळके, आजिनाथ तरटे, नवनाथ गुंजाळ, ज्ञानदेव तरटे, मुरलीधर तरटे, माधव तरटे, किसन तरटे, संपत तरटे, विठ्ठल तरटे, विष्णू निंबाळकर, ज्ञानदेव निंबाळकर, हेमंत निंबाळकर, पांडुरंग तरटे, आबा तरटे, चंद्रभान धामणे, शिवराज धामणे, रविंद्र धामणे, विजय धामणे, प्रदीप भोस, लालू भोस, सोपान बेरड, राहुल चारुडे, बनू उगले, भोला शिंदे, बबन बोबडे, गणेश दाते, धनू दाते, सोमा उल्हारे (कोतवाल), विठ्ठल जरांगे, दयानंद शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत हक्काचा, दर्जेदार व कायमस्वरूपी शेत–वहिवाट रस्ता मिळावा, यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन कामाचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे शिवपानंद चळवळीच्या वतीने सांगण्यात आले.
“फक्त कागदावर निर्णय नाही, तर शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष कृती” या भूमिकेतून अभियान पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

















