spot_img
spot_img
spot_img

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹२५ हजारांची मदत द्या; संभाजी ब्रिगेड आक्रमक! कर्जमाफीच्या यादीतून वंचित शेतकऱ्यांची नावे संकलित करणार; ३ ते ४ दिवसांत माहिती देण्याचे वैभव लाळगे यांचे आवाहन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹२५ हजारांची मदत द्या; संभाजी ब्रिगेड आक्रमक!

 

कर्जमाफीच्या यादीतून वंचित शेतकऱ्यांची नावे संकलित करणार; ३ ते ४ दिवसांत माहिती देण्याचे वैभव लाळगे यांचे आवाहन

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) —.                दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने प्रत्येकी ₹२५ हजारांची अग्रिम मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, कर्जतच्या वतीने करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेली ₹५ हजारांची मदत अपुरी असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

 

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही यादीत नाव नसलेल्या किंवा कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांनी पुढील तीन ते चार दिवसांत आपली माहिती संभाजी ब्रिगेड, कर्जत यांच्याकडे द्यावी. संकलित यादी तहसीलदार, कर्जत यांच्याकडे सादर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष वैभव लाळगे यांनी सांगितले.

 

तसेच मागील वर्षी अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या, मात्र पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहितीही निर्धारित मुदतीत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रमुख मागण्या : दुष्काळग्रस्तांना ₹२५ हजारांची मदत, प्रलंबित कर्जमाफी तातडीने जमा करणे, यादीतून वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ देणे आणि पीकविमा नसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!