spot_img
spot_img
spot_img

 **राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी घेतले राशीनच्या श्री जगदंबा देवीचे दर्शन!**

**राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी घेतले राशीनच्या श्री जगदंबा देवीचे दर्शन!**

** श्री जगदंबा देवी चे देवीचे पुजारी वैभव रेणुके वतीने मान्यवरांचा सत्कार**

 

**राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :** कर्जत तालुका दौऱ्याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राशीन (ता. कर्जत) येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा (यमाई) देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

या प्रसंगी  श्री जगदंबा देवी चे पुजारी वैभव रेणुके यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राशीनच्या ऐतिहासिक श्री जगदंबा देवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मान्यवरांनी देवीच्या  पुजारी मंडळाने केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले.

 

आई जगदंबेच्या दर्शनाने मनाला समाधान मिळाले असून देवीची कृपादृष्टी सर्वांवर कायम राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या दौऱ्यामुळे राशीनच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाची पुन्हा एकदा चर्चा झाली.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!