spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी रमेश व्हरकटे यांची नियुक्ती!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी रमेश व्हरकटे यांची नियुक्ती!

कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी; पक्षवाढीसाठी संघटनात्मक कार्य करण्याचे आव्हान

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील रमेश व्हरकटे यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ साधू शेवते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या स्वाक्षरीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. या नियुक्तीनुसार व्हरकटे यांची निवड एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात, विशेषतः कर्जत-जामखेडश्रीगोंदा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटनात्मक कार्य वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे, पक्षाची शिस्त व संघटनात्मक बांधिलकी जपणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

 

या नियुक्तीमुळे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्याला चालना मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात रमेश व्हरकटे पक्षाच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवतात आणि स्थानिक पातळीवर संघटन विस्तारासाठी कशा प्रकारे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!