spot_img
spot_img
spot_img

*दारूच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनीच केला मुलाचा खून; नगर तालुका पोलिसांकडून घटनेचा उलगडा*

—

*प्रेस नोट*

*नगर तालुका पोलीस स्टेशन, अहिल्यानगर*

 

*दारूच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनीच केला मुलाचा खून; नगर तालुका पोलिसांकडून घटनेचा उलगडा*

अहिल्यानगर, दि. 05 ऑक्टोबर 2026:

प्रतिनिधी श्रीगोंदा सागर शेळके

दि. 04/10/2026 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे हे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व आदेशान्वये हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, गुणवडी गावचे शिवारात प्रकाश विनायक लांडगे यांच्या शेतातील छोट्या कोरड्या शेततलावात मनुष्य सदृश्य जळालेले अवशेष व बारीक जळालेली हाडके दिसत आहेत.

 

माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने तपास केला असता, खूनाच्या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

*घटनेचा तपशील:*

आरोपी 1. प्रकाश विनायक लांडगे आणि 2. आशा प्रकाश लांडगे (रा. गुणवडी, ता. जि. अहिल्यानगर) यांचा मुलगा प्रविण प्रकाश लांडगे, वय 25 वर्षे, हा रोज दारू पिऊन घरी येऊन आई-वडिलांना त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून दि. 26/09/2026 रोजी रात्री 08:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी क्र. 1 याने मयत प्रविण याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्यास जीवे ठार मारले.

 

त्यानंतर आरोपी क्र. 1 व 2 यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत गुणवडी गावचे शिवारातील त्यांच्या शेत गट नं. 151 मध्ये नेऊन जाळून टाकले.

 

सदर प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 866/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

*कामगिरी करणारे पथक:*

पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोहेकॉ आबासाहेब झावरे, पोहेकॉ शरद वांढेकर, पोहेकॉ मंगेश खरमाळे, पोहेकॉ राहुल थोरात, पोकॉ विक्रांत भालसिंग यांनी ही कामगिरी केली.

 

पुढील तपास प्रभारी अधिकारी गणेश वारुळे नगर तालुका पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!