spot_img
spot_img
spot_img

रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :                       रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राशीन येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९ वा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहूराजे राजेभोसले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उद्योजक मेघराज बजाज, बापू सुखदेव धोंडे, प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक रामदास सलगर, बिभीषण जंजिरे,भास्कर मोढळे तसेच प्रमुख वक्ते प्रा. अजित खरसडे (श्रीगोंदा) उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रा. अजित खरसडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कर्मवीरांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. उद्योजक रामदास सलगर व भास्कर मोढळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विविध शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटीचे रामकिसन साळवे, ज्ञानेश्वर (माऊली) सायकर, विक्रम राजेभोसले, तसेच अशोक जंजिरे, दादासाहेब परदेशी, मालोजीराजे भिताडे, एम.डी. कानगुडेसाहेब, मधुकर दंडे, मा.रयत सेवक नेटके सर, खंडागळे सर कानगुडे सर सय्यद सर झगडे सर सोनवणे सर शेटे सर साळवे सर रुद्र दादा राऊत अंबादास गव्हाणे अंकुश साळवे विजय साळवे सर घायाळ काका यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक, माजी विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश उधाने यांनी केले. सूत्रसंचालन भगवान शिंदे व सौ. पल्लवी घोडके यांनी केले, तर आभार किशोर करपे यांनी मानले. प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!