spot_img
spot_img
spot_img

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, घोगरगाव येथे 139 वी कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, घोगरगाव येथे 139 वी कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

श्रीगोंदा प्रतिनिधी.  …सागर शेळके

घोगरगाव : रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, घोगरगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील लेझीम व झांज पथकाने उत्साहपूर्ण सादरीकरण केले. त्यानंतर कर्मवीर रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

या कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य नामदारभाई शेख, घोगरगावच्या सरपंच सौ. सुजाताताई भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, माजी सरपंच श्री. बाळासाहेब उगले, श्री. मिलिंद भोसले, श्री. बबन गुंजाळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रवीणकुमार लोंढे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतिश गोरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा व रयत शिक्षण संस्थेच्या समाजप्रबोधनाच्या विचारांचा जागर या निमित्ताने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या विचारांचा व शैक्षणिक कार्याचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

 

कर्मवीर जयंती सोहळ्याचा कार्यक्रम शनिवार, दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!