spot_img
spot_img
spot_img

निष्ठावंत शिवसैनिकाला पक्षाची ताकद; राशीनमध्ये सुभाष जाधव यांचा दणदणीत सत्कार!”

निष्ठावंत शिवसैनिकाला पक्षाची ताकद; राशीनमध्ये सुभाष जाधव यांचा दणदणीत सत्कार!”.                                                                                            छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राशीन शहर शिवसेनेतर्फे जाधव यांचा जंगी सत्कार

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक मा. सुभाष जाधव, राशीन यांची कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल राशीन शहर शिवसेनेच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना राशीन शहरप्रमुख मा. जितेंद्र स्वामी शेटे यांच्या हस्ते सुभाष जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

सुभाष जाधव यांच्यावर पक्षाने विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवल्याने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निष्ठावंत शिवसैनिक ते विधानसभा प्रमुख असा जाधव यांचा प्रवास शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

 

यावेळी ॲड. विकी साळवे, उपशहरप्रमुख अमृतजी जंजिरे, उपशहरप्रमुख संदीप राऊत, औदुंबर देवगावकर, शाखाप्रमुख बाबा तांबोळी, शाखाप्रमुख सुनील काका दडगळ, युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष दादा राऊत, अमर साळवे, राजेंद्र मुसळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“पक्षाची विचारधारा, शिवसैनिकांची ताकद आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करू,” असा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!