spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोर्टाचा आदेश अन् SP यांच्या निर्देशानंतरही कारवाई नाही? SP मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशालाही केराची टोपली ! भिंगार कॅम्पच्या API ने फिर्यादीला मागितला 2 दिवसाचा वेळ; अहिल्यानगर पोलीस प्रशासनात काय शिजतंय शिजतंय शडयंत्र ?

कोर्टाचा आदेश अन् SP यांच्या निर्देशानंतरही कारवाई नाही?SP मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशालाही केराची टोपली! भिंगार कॅम्पच्या API ने फिर्यादीला मागितला 2 दिवसाचा वेळ; अहिल्यानगर पोलीस प्रशासनात काय शिजतंय शिजतंय शडयंत्र?

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) सागर शेळके – अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी आरोपींवर तात्काळ कारवाईचे आदेश देऊनही भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे API कारवाई करण्याऐवजी फिर्यादी महिलेकडेच दोन दिवसांचा वेळ मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळून 10 दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहेत, आणि आता SP साहेबांच्या आदेशानंतरही API वेळ मागत असल्याने या मागे मोठे शडयंत्र असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. “आमच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार?” असा आक्रोश पीडित मीना खोमणे यांनी केला आहे.

 

पोलिस अधीक्षक यांनी dysp टिपरसे यांना तोंडी आदेश दिल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प च्या API थोरात मॅडम यांनी आरोपी यांना अटक करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ कशासाठी?*

 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मीना राजेंद्र खोमणे (रा. निंबोडी) यांनी दि. 12.09.2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. SP साहेबांनी तात्काळ दखल घेऊन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याला आरोपींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

 

परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे, आदेश मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प येथील संबंधित API यांनी कारवाई करण्याऐवजी फिर्यादी महिलेलाच “दोन दिवस वेळ द्या” अशी विनंती केली.

 

यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत:

 

1. SP साहेबांच्या आदेशानंतरही दोन दिवसाचा वेळ कशासाठी मागितला जात आहे?

 

 

2. या दोन दिवसात आरोपींना पळून जाण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे का?

 

 

3. सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपींशी पोलिसांचे काही लागेबांधे आहेत का?

 

 

4. न्यायालयाने स्पष्टपणे “कोठडी चौकशी आवश्यक” आणि “साक्षीदारांना धोका” असे म्हटले असतानाही, पोलिसांकडून आरोपींना संरक्षण दिले जात आहे का?

 

 

 

कोर्टाने काय म्हटले होते? पुन्हा एकदा वाचा –

 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एम. एस. भदाणे यांनी दि. 02.09.2026 रोजी Cri. Bail Appln. No. 1235/2026 फेटाळताना स्पष्ट निरीक्षण नोंदवले होते की:

 

आरोपींवर यापूर्वी 6 गंभीर गुन्हे दाखल असून ते सवयीचे गुन्हेगार आहेत.

 

एका गुन्ह्यात (Sessions Case 320/2016) त्यांना शिक्षा देखील झाली आहे.

 

त्यांनी फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

 

त्यांनी फिर्यादीच्या आई आणि भावाला गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

तपासासाठी त्यांची कोठडीत चौकशी अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते साक्षीदारांना धमकावतील.

 

 

फिर्यादीच्या जीवाला धोका – जबाबदारी कोण घेणार?

 

दुसऱ्या बाजूला, आरोपी मोकाट असल्याने ते रोज फिर्यादी आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ आणि धमक्या देत आहेत. पीडित महिलेने दोन गुन्हे दाखल केले आहेत – FIR 564/2025 (मारहाण, विनयभंग) आणि FIR 609/2025 (दि. 24.11.2025 – BNS कलम 76, 118, 351).

 

आरोपींची नावे – जयराम कचरू बेरड, विकास कचरू बेरड, बहिरू सूर्यभान बेरड, अंबादास बाबुराव बेरड.

 

पीडित महिलेचा सवाल आहे की, “SP साहेबांनी आदेश देऊनही जर खालचे अधिकारी दोन दिवस वेळ मागत असतील, तर या काळात आमच्यावर पिस्तुलातून हल्ला झाला किंवा आमच्या जीवाला काही बरे-वाईट झाले, तर याची सर्वस्वी जबाबदारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची आणि संबंधित API ची राहील.”

 

या प्रकरणात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित API ची चौकशी करून तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत

Related Articles

– काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसल ं !

🌙✨ काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसलं! ✨🌙   दिवसभराच्या धावपळीनंतर आकाशाने जणू क्षणभर विसावा घेतला… नभाच्या अथांग पटलावर उमटलेली चंद्रकोर आणि तिच्या...

आला रे आला… गणपती बाप्पा आला ! गणेशाच्या जयघोषान े राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे

आला रे आला... गणपती बाप्पा आला! गणेशाच्या जयघोषाने राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी : “गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!” या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!