राज्याला दिशादर्शक श्रीगोंदा; जंगलेवाडी–काष्टी शिवरस्त्याचे यशस्वी सीमांकन
श्रीगोंदा | प्रतिनिधी सागर शेळके
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जंगलेवाडी–काष्टी शिवरस्त्याचे सीमांकन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. प्रशासन आणि शेतकरी यांच्या समन्वयातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्याच्या प्रश्नाला आता प्रत्यक्ष मार्ग मिळाला आहे.
पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच श्रीगोंदा विधानसभा क्षेत्रीय समिती अध्यक्ष आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली, श्रीगोंदा–पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे आणि भूमी उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या आदेशानुसार हे काम करण्यात आले.
शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे मार्गदर्शक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली परिरक्षण भूकरमापक वासुदेव पाटील यांनी जंगलेवाडी–काष्टी शिवरस्त्याचे अचूक सीमांकन पूर्ण केले.
यावेळी मंडळ अधिकारी कटरनवरे यांच्यासह आबासाहेब जंगले, पंढरीनाथ जंगले, संतोष राहींज, बबनराव जंगले, बाळासाहेब पानसरे, ज्ञानदेव जंगले, नवनाथ जंगले, चंद्रकांत जंगले, रमेश जंगले, बापूराव पाटील जंगले, राहुल जंगले, मदन भोसले, विशाल जंगले, बाबासाहेब जंगले, सुरेश गावडे, संतोष पानसरे, अनिल जंगले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नकाशावरील रस्ता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर आणणे हा केवळ कागदोपत्री निर्णय नसून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि शेतकरी यांच्या समन्वयातून शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्यवाही होत असल्याचे या सीमांकनातून दिसून आले.
जंगलेवाडी–काष्टी शिवरस्त्याच्या सीमांकनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांचे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.








